Wednesday, 3 December 2014

शेवटी चूक ही माझ्याकडूनच घडली !!

लहानपणापासून मी प्रेमळ होतो,
सर्वाना हे प्रेम देत राहिलो,
पण देवाला काही औरच मान्य होते,
याच प्रेमापासून मी वंचित राहिलो ..

आयुष्यात खूप मित्र आले,
काही आयुष्याचे अविभाज्य भाग बनले,
मात्र असा एकही नव्हता,
ज्याने माझे आयुष्य सारले ..

अचानक आयुष्याने एक वळण घेतले,
जीवनात माझ्या तुला आणले,
उंच भरारी मानाने घेतली,
मैत्रीच्या प्रेमात मन हरवून गेले ..

याच गगनात उडता उडता,
अचानक नभ भरून आले,
बेभान मन सावरण्याच्या आत,
प्रेमाचे आभाळ वाहून गेले ..

या प्रलयाला एकाच कारण होते,
एक चूक जी 'नकळत' झाली,
आपण दोघे दूरवर फेकलो गेलो,
तिमिराची चादर पुन्हा माझ्या जीवनी आली ..

प्रयत्नांची पराकाष्टा मी केली,
पण तिमिराने प्रकाशावर मात केली,
मी मनापासून तुझी माफी मागतो,
शेवटी चूक ही माझ्याकडूनच घडली ..

No comments:

Post a Comment